Loading...

अंत्यविधीपूर्वी भय्यू महाराजांना अशी न्याहाळत होती कन्या, पत्नीलाही नव्हती शुद्ध

भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून भक्तांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वांना मोठा धक्का बसला

Divya Marathi Jun 13, 2018, 14:25 IST

इंदूर - भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून भक्तांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. येथे येणारे भक्त म्हणतात की, महाराज असे करू शकत नाहीत. भय्यू महाराजांचा मृतदेह बुधवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी बापट चौकातील त्यांच्या सूर्योदय आश्रमात ठेवण्यात आला. दुपारी 2 वाजता येथून अंत्ययात्रा निघाली. भमोरी येथील स्मशानघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. भय्यू महाराजांनी मंगळवार दुपारी आपल्या स्प्रिंग व्हॅली येथील घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

 

अंत्यदर्शनाला हजारो भक्तांनी केली गर्दी...
- भय्यू महाराजांच्या मृत्यूच्या बातमीमुळे देशभरातून त्यांचे भक्त येत आहेत.
- बुधवारी पहाटेपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आश्रम आणि त्यांच्या घरी भक्तांची गर्दी होऊ लागली.
- आपल्या गुरूची एक झलक मिळवण्यासाठी हजारो भक्त बापट चौकातील सुर्योदय आश्रमात पोहोचले आहेत. भक्तांमध्ये महिला आणि लहान मुलेही सामील आहेत. 

 

10 ओळींची सुसाइड नोट
- 'कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी येथे कोणीतरी पाहिजे, मी खूप तणावात आहे, थकलो आहे. म्हणून जात आहे. विनायक माझा विश्वासू आहे. सर्व प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट त्यानेच सांभाळावी. कुणाला तरी कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागेल, तो ती करेल. माझा त्याच्यावर विश्वास आहे. मी रूममध्ये एकटा आहे आणि सुसाइड नोट लिहीत आहे. कुणाच्या दबावात येऊन लिहीत नाही. कुणीही यासाठी जबाबदार नाही.'

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

 


Loading...

Recommended


Loading...