Loading...

पंतप्रधानांच्या ताफ्याआधी अॅम्ब्यूलन्सला मार्ग देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे हायकोर्ट जजने केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वच्छता अवॉर्ड कार्यक्रमासाठी इंदूरला आले होते. तेव्हा त्यांचा ताफा येण्यापूर्वी एक अॅम

Divya Marathi Jun 25, 2018, 12:53 IST

इंदूर (मध्यप्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता, त्या मार्गावरील एका चौकात अॅम्ब्यूलन्सला वाट करुन देणारे पोलिस अधिकारी मनोज रत्नाकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंदूर हायकोर्टचे जज स्वतः पुष्पगुच्छ घेऊन सीएसपी ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी सीएसपी मनोज रत्नाकर यांना पुष्पगुच्छ देऊन वेलडन म्हणत, त्यांनी दाखवलेली समयसुचकतेचे कौतूक केले. दुसरीकडे, ज्या महिला पेशंट्साठी पोलिस अधिकाऱ्याने हे काम केले होते, त्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांनी देखील पोलिस अधिकाऱ्याला धन्यवाद दिले आहेत. 

 

काय आहे प्रकरण 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वच्छता अवॉर्ड कार्यक्रमासाठी इंदूरला आले होते. तेव्हा त्यांचा ताफा येण्यापूर्वी एक अॅम्ब्यूलन्स चौकात येऊन थांबली. अॅम्ब्यूलन्समध्ये असलेल्या महिला पेशंट निशी वैद्य यांची प्रकृती गंभीर होती. तेव्हा पंतप्रधानांचा ताफा विमानतळावरुन रवाना झाला होता, परंतू चौकात येण्यासाठी अजून बराच वेळ होता. 
- पोलिस अधिकाऱ्याने पाहिले की महिलेच्या तोंडातून रक्त येत आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे लागलीच त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, काही सेकंदात मला निर्णय घ्यायचा होता. कारण तेव्हा मी व्हीव्हीआयपी सुरक्षेत तैनात होता. तत्काळ सर्व गोष्टींचा विचार केला आणि अॅम्ब्यूलन्सला जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला. 
- इंदूर हायकोर्टचे जज म्हणाले, पोलिस अधिकाऱ्याच्या संवेदनशिलतेने मी प्रभावित झालो. त्यामुळेच त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.


Loading...

Recommended


Loading...