Loading...

मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये ट्रॅक्टर-जीपचा अपघात, एकाच कुटुंबातील १५ ठार; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील गंजरामपूर गावात गुरुवारी ट्रॅक्टर ट्राॅली व जीपच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात एकाच

Divya Marathi Jun 22, 2018, 08:37 IST

मुरैना- मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील गंजरामपूर गावात गुरुवारी ट्रॅक्टर ट्राॅली व जीपच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात महिलांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. ट्रॅक्टर ट्राॅली वाळूने भरलेली हाेती. गंजरामपूर गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट जीपवर जाऊन धडकले. 


मृत्युमुखी पडणाऱ्यांत सात महिला व अाठ पुरुषांचा समावेश अाहे. जीपमध्ये एकाच कुटुंबातील २० जण हाेते व ते त्यांच्या एका नातेवाइकाच्या निधनानंतर शाेक कार्यक्रमात सहभागी हाेण्यासाठी जात हाेते. प्रेमा माहाैर (५०), वीणा माहाैर (३०), पाराेबाई (४५), भुरी माहाैर (५०), गीताबाई माहाैर (३०), कुंताेबाई माहाैर (७०), रामबेटी माहाैर (३०), विजयसिंह माहाैर (६०), रणछाेड माहाैर (३०), बल्लू माहाैर (३५), रामनिवास माहाैर (२५), राजबीर माहाैर (२५), अंतरसिंह माहाैर (५०), कैलाश माहाैर (५०) व उत्तम माहाैर (५६) अशी मृतांची नावे अाहेत. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला, असे मुरैनाचे पाेलिस अधीक्षक अमित सांघी यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून मुरैनामध्ये झालेल्या रस्ते अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य मंत्री रुस्तम सिंह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींचीही भेट घेतली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी Photos...  

 


Loading...

Recommended


Loading...