Loading...

भय्यूजी महाराजांच्या सुसाइड नोटची 2 पाने, हँडराइटिंग एकसारखी नाही! दुसरी सुसाइड नोट खोटी

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज सुसाइड केसला खळबळजनक वळण लागले आहे. इंदूर पोलिसांना जी दुसरी सुसाइड नोट आढळली आहे त्यातील

Divya Marathi Jun 14, 2018, 11:18 IST

इंदूर (म.प्र.) - आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज सुसाइड केसला खळबळजनक वळण लागले आहे. इंदूर पोलिसांना जी दुसरी सुसाइड नोट आढळली आहे त्यातील हस्ताक्षर आधी सापडलेल्या सुसाइड नोटपेक्षा वेगळे आहे. एवढेच नाही, पोलिसांना संशय आहे की, दोन्ही सुसाइड नोट वेगवेगळ्या पेनने लिहिण्यात आल्या आहेत. 

तथापि, दुसऱ्या सुसाइड नोटमध्ये भय्यूजी महाराजांनी आपली सर्व संपत्ती आणि बँक खात्यांचा मालकी हक्क आपला 15 वर्षे जुना विश्वासू सेवेकरी विनायकच्या नावे केला आहे. तथापि, या कथित सुसाइड नोटवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


आधी मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये भय्यूजींनी तणावाला कंटाळून जीव देत असल्याचे लिहिले होते, तर दुसऱ्या नोटमध्ये महाराजांनी आपली पूर्ण संपत्ती आणि बँक खात्यांचा मालकी हक्क सेवेकरी विनायकला दिला आहे.


भय्यू महाराजांच्या श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टची देशभरात कोट्यवधींची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रस्टमध्ये 11 ट्रस्टी आणि 700 हून जास्त आजीवन सदस्य आहेत, ज्यात 95% हून जास्त महाराष्ट्रतील आहेत.


दुसरीकडे, महाराजांनी सुसाइड नोटमध्ये ज्या विनायक यांना आपला उत्तराधिकारी बनवले आहे, तेही ट्रस्टी आहेत. विनायक 1996 मध्ये म्हणजेच 21 वर्षांपूर्वी आश्रमात भय्यू महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.

तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर महाराजांची त्यांची भेट झाली. यातून ते एवढे प्रभावित झाले की, आश्रमाचे नियमित सेवेकरी बनले. महाराजांच्या आईची काळजी तेच घेत होते.

सूत्रांनुसार, असे म्हटले जात आहे की, महाराजांना मुलीशी भेटू न देण्याचा कट रचला जात होता. याच कारणामुळे महाराज सोमवारी मुलीला भेटण्यासाठी पुण्याला रवाना झाले होते, परंतु अर्ध्या वाटेतूनच परतले.

अशा वेळी प्रश्न उपस्थित होत आहे की, त्यांना मुलीला भेटू न देण्यासाठी कुणीतरी कट तर नाही रचला. दुसरीकडे, महाराजांच्या दोन सुसाइड नोटची कहाणी बनावट निघाली आहे. महाराजांची एकच सुसाइड नोट होती, दुसरी कुणीतरी बनावट बनवली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...   

 


Loading...

Recommended


Loading...