Loading...

भय्यू महाराज आत्महत्या: पत्नी आयुषीच्या हॉस्टेलमध्ये पोहोचले पोलिस, सुसाइड नोटची लॅबमध्ये तपासणी

भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी भंवरकुवा परिसरातील एका होस्टेलमध्ये पोहोचून चौकशी केली.

Divya Marathi Jun 14, 2018, 18:40 IST

इंदूर - भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी भंवरकुवा परिसरातील एका होस्टेलमध्ये पोहोचून चौकशी केली. भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. आयुषी लग्नापूर्वी याच होस्टेलमध्ये राहत होत्या. पोलिसांनी भय्यू महाराजांच्या सुसाइड नोटला तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवणार असल्याचे सांगत आहेत. भय्यू महाराजांनी मंगळवारी (12 जून) स्प्रिंग व्हॅली येथइील आपल्या बंगल्यातच गोळी झाडून आत्महत्या केली होती. बुधवारी भय्यू महाराजांच्या पार्थिवावर भमोरी मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 

- भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. आयुषी लग्नापूर्वी भंवरकुवा क्षेत्रात परमहंस होस्टेलमध्ये राहत होत्या.  पोलिसांनी येथे राहणाऱ्या विद्यार्थिनींसोबतच संचालकाकडेही चौकशी केली आहे. पोलिसांनी संचालकांना आयुषी यांच्या वर्तणुकीबाबत माहिती विचारली. सेाबतच आयुषी यांच्यासोबत आणखी कोण-कोण राहायचे, मित्र कोण होते आणि येण्याजाण्याची वेळ इत्यादीबाबत चौकशी केली.

- चौकशीत पोलिसांना आयुषी यांच्या जुन्या मित्रांच्या माहितीसोबतच त्यांचे नंबरही मिळाले. पोलिसांना कळले की, विवेक आणि सचिन नावाच्या तरुणांशी आयुषी यांची चांगली मैत्री होती. या दोघांसोबतच पोलिस होस्टेल संचालक सुनील जैनचीही वेगळी चौकशी करणार आहेत.


नोकरीच्या शोधात आल्या होत्या इंदुरात
- होस्टेलमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांना सांगितले की, आयुषी नोकरीच्या शोधात इंदुरात आल्या होत्या, त्यादरम्यान त्यांना भय्यू महाराज यांच्या येथे काम मिळाले. भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका दिवशी आयुषी अचानक आपले सामान घेऊन जाऊ लागली, विचारल्यावर म्हणाली की, ती भय्यू महाराजांशी लग्न करणार आहे.

- चौकशी कळले की, जेव्हा आयुषी होस्टेलमध्ये राहत होत्या, तेव्हा खूप कंजूसपणे वागायच्या. थोड्या पैशांवरूनही त्या वाद घालायच्या, परंतु महाराजांच्या येथे नोकरी लागल्यानंतर त्यांची लाइफस्टाइलच बदलली होती.

 

एकापाठोपाठ संपत्ती विकू लागले होते भय्यू महाराज
- पोलिस चौकशीत हे समोर आले आहे की, मागच्या काही काळापासून भय्यू महाराज एकापाठोपाठ आपली संपत्ती विकू लागले होते. महाराजांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांतील आपल्या जमिनीचा सौदा केला होता. पोलिस हे शोधताहेत की, भय्यू महाराजांची प्रॉपर्टी कुठे-कुठे आहे आणि किती प्रॉपर्टी विकत आहे. सूत्रांनुसार, मागच्या काही महिन्यांपासून त्यांनी कोट्यवधींची प्रॉपर्टी विकली आहे. यासंबंधी पोलिस त्यांचा विश्वासू सेवेकरी विनायक दुधाडे (42) याची चौकशी करत आहेत.

- घटनेनंतर पोलिस भय्यू महाराज यांच्यासोबतच कुटुंबातील इतर सदस्य आणि सेवेकऱ्यांचे मोबाइल कॉल डिटेल तपासले जात आहेत. पोलिसांच्या मते, घटनेच्या दिवशी भय्यू महाराज आणि त्यांची मुलगी कुहू (कल्याणी) यांच्या दीर्घ बातचीत झाली होती. दोघांमध्ये काय बोलणे झाले याची माहिती काढली जात आहे.

 

गुंडाशी जवळीकही चर्चेत
गुंड युवराज उस्तादशी भय्यू महाराजांच्या जवळीकतेचीही खूप चर्चा होत आहे. बुधवारी महाराजांच्या अंत्यसंस्कारावेळीही युवराज उस्ताद व्यवस्था सांभाळत होता. याचे कारण काहीही असो, परंतु पोलिस या मुद्द्यावरही तपास करत आहेत. तथापि, नोटबंदीनंतर युवराजचे भय्यू महाराज यांच्याकडे येणे-जाणे वाढले होते. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 


Loading...

Recommended


Loading...