Loading...

दोन अपघातांत 17 ठार; तेलंगणात ट्रॉली कालव्यात पडली तर मध्यप्रदेशात कार-ट्रकची धडक

तेलंगणा आणि मध्यप्रदेशात रविवारी झालेल्या दोन रस्ते अपघातांत 17 जणांनी प्राण गमावले.

Divya Marathi Jun 24, 2018, 14:10 IST

भोपाळ/हैदराबाद - तेलंगणा आणि मध्यप्रदेशात रविवारी झालेल्या दोन रस्ते अपघातांत 17 जणांनी प्राण गमावले. तर 19 जण जखमी आहेत. तेलंगणामध्ये एका बाईकला वाचवण्याच्या नादात ट्रॅक्टरची ट्रॉली कालव्यात कोसळली. त्यात 13 महिलांचा मृत्यू झाला तर 17 जखमी आहेत. दुसरीकडे मध्यप्रदेशच्या इंदूरहून येणारी एक कार ट्रकला धडकली, त्यात दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जखमी झालेत. 


ट्रॉलीत होते 30 मजूर 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 30 मजूर प्रवास करत होते. ते सर्व यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील वेमुलाकों गावातून शेतीत काम करण्यासाठी जात होते. लक्ष्मीपुरम गावाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली मुसी कालव्यात पडली. 


राँग साइड होता ट्रक 
मध्यप्रदेशात आष्टाच्या पुढे रात्री 2 वाजता अपघात झाला. कारमध्ये प्रवास करत असलेले सर्व लोक, इंदूरहून एका लग्नाहून परतत होते. ट्रक राँग साईडने येत होता असे सांगितले जात आहे. मृतांमध्ये सहा महिन्याच्या एका चिमुरडीसह चार जणांचा समावेश आहे. 

 


Loading...

Recommended


Loading...