Loading...

महंतांचे दर्शन होताच शेवटची इच्छा पूर्ण, आशीर्वाद घेताच भक्ताने सोडले प्राण

महंत स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर काही मिनिटातच एका भक्ताने आपला जीव सोडला.

Divya Marathi Aug 02, 2018, 12:03 IST

गोध्रा (गुजरात) - महंत स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर काही मिनिटातच एका भक्ताने आपला जीव सोडला. सोमवारी भक्त नार सिंह गोहिल (88) मुलगा तरुणसोबत महंत स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यांची इच्छा होती की, महंत स्वामींनी त्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करावी. संयोगाने सोमवारी असे घडलेही. गोध्राच्या रामनगर स्थित स्वामीनारायण मंदिरात 7 दिवसांचा महोत्सव चालू आहे. येथे महंत स्वामी उपस्थित आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ही घटना घडली.


खूप जगलो, आता कृपा करा बापूजी
- दर्शन घेताना आशीर्वाद मागताना तरुणने सांगितले की - वडिलांचे वय 88 वर्षांचे असून किडनी आजाराने ग्रस्त आहेत. तुम्ही त्यांची वैकुंठात जाण्याची इच्छा पूर्ण करा.

- स्वामीजी म्हणाले- हो, देवाकडे प्रार्थना करेल. नरसिंह म्हणाले- बाबा असे नाही, तुम्ही म्हणा वैकुंठ मिळेल.

- वडील आणि मुलगा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले. कक्षाची पहिली पायरी उतरत असताना नारसिंह बेशुद्ध होऊन पडले.

- स्वामीजींने नारसिंह यांच्या मुखात जल टाकले आणि लगेच नारसिंह यांनी प्राण सोडला.


खरा ठरला महंत स्वामींचा आशीर्वाद 
- तरूणने सांगितले की- वडिलांसोबत तो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी नेहमी जात होता. वडिलांनी आपला त्रास सांगत म्हटले होते की- 'मला पाय घासत-घासतच शरीर सोडावे लागेल'. 
- स्वामी म्हणाले, तुम्ही श्रीनारायणासोबत संबंध जोडला आहे, यामुळे असे काहीही होणार नाही. ते स्वतः तुम्हाला घेण्यासाठी येतील आणि सोमवारी ही गोष्ट खरी झाली.


Loading...

Recommended


Loading...