Loading...

हायप्रोफाइल मर्डर केस: मित्राच्या Wifeसोबत होते असे नाते, हत्येआधी ठेवले शारीरिक संबंध?

हायप्रोफाइल मर्डर केसमध्ये खळबळजनक खुलासा झाला आहे. मित्राच्या पत्नीची हत्या करणारा आरोपी संजय डोबरिया याने बीनाची हत्या

Divya Marathi May 10, 2018, 13:16 IST

सूरत - हायप्रोफाइल मर्डर केसमध्ये खळबळजनक खुलासा झाला आहे. मित्राच्या पत्नीची हत्या करणारा आरोपी संजय डोबरिया याने बीनाची हत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी तिचे कपडे बदलले. कपडे कुठे बदलले, मृतदेह घेऊन तो कुठे-कुठे फिरला, हत्यासाठी वापरण्यात आलेली वायर कुठे आहे, या संपूर्ण घटनाक्रमात त्याच्यासोबत आणखी कोण होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी संजय डोबरियाची 7 दिवसांची पोलिस कोठडी मागतली, त्याला कोर्टाने मंजूरी दिली आहे. दुसरीकडे, बीनाचा पती आणि आरोपी संजयचा मित्र नीलेश वीराणीचे म्हणणे आहे, की संजय त्याचा बालपणीचा मित्र आहे. त्याने बीनासोबत असे काही केले असेल यावर विश्वास बसत नाही. 

 

हायप्रोफाइल मर्डर केस 
- हत्या करण्यात आलेली बीना वीराणी ही डॉक्टर होती. तिचा पती डॉ. नीलेश वीराणीने पोलिसांना सांगितले, की आरोपी संजय डोबरिया त्याचा बालपणीचा मित्र आहे. 
- डॉ. नीलेशला आरोपी संजयवर एवढा विश्वास होता की तो कधी असे काही करेल यावर विश्वास बसत नाही. 
- तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एम.एल डोमार म्हणाले, डॉ. नीलेशने सांगितले की आरोपी संजय त्याचा बालपणीचा मित्र होता. त्यामुळे त्याला कधी शंकाही आली नाही करी डॉ. बीना आणि संजय यांच्यात काही सुरु आहे. 
- पोलिसांनी बीनाचा मृतदेहाचे फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम केले आहे. त्यात समोर आले आहे की संजयने हत्येच्याआधी बीनासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. वास्तविक अहवाल आल्यानंतरच त्याची पुष्टी होणार आहे. 

 

कुठे सापडला मृतदेह 

- वराछा येथील आयुर्वेदिक डॉक्टर नीलेश यांची पत्नी डॉ. बीना यांचा मृतदेह 27 एप्रिल रोजी डांग येथील वघई जवळ सांकलपातल गावात एका पुलाखाली सापडला होता. 
- पोलिसांनी सुरुवातीलाच शंका व्यक्त केली होती की हत्येमागे ओळखीच्या व्यक्तीचा हात असला पाहिजे. पोलिसांनी सूरतपासून वघईपर्यंतचे जवळपास 30 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले होते. 

 

बीनाचे कपडे का बदलले?
- मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्यानंतर तिच्याकडून लग्नासाठी वाढणाऱ्या दबावानंतर आरोपी संजय डोबरियाने बीनाची हत्या केली. 
- बीनाची हत्या केल्यानंतर आरोपी संजयने तिचे कपडे बदलले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीने बीनाचे कपडे कुठे बदलले आणि रक्त लागलेले कपडे कुठे फेकले यासाठी त्याची 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे. 
- हत्येच्यावेळी बीना आणि संजयच तिथे होते की कोणी तिसरी व्यक्तीही होती याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे. 
- हत्येसाठी वापरण्यात आलेली वायर कुठे आहे, याचेही उत्तर पोलिसांना अजून मिळालेले नाही.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाला आरोपी संजय... 


Loading...

Recommended


Loading...