Loading...

पणजीतून सहाव्यांदा निवडून येईन; मनोहर पर्रीकरांना प्रचंड विश्वास

आपल्या विरोधात कोण उमेदवार असेल याची आपल्याला तमा नाही परंतु पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूकीत ३० टक्के मतांची आघाडी घेऊन आपण निवडून येणार, असा प्रचंड विश्वास माजी सरंक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. पणजी मतदारसंघ हीच आपली खरी पसंती होती, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Divya Marathi May 11, 2017, 21:40 IST
गोवा- आपल्या विरोधात कोण उमेदवार असेल याची आपल्याला तमा नाही परंतु पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूकीत ३० टक्के मतांची आघाडी घेऊन आपण निवडून येणार, असा प्रचंड विश्वास माजी सरंक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. पणजी मतदारसंघ हीच आपली खरी पसंती होती, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पणजी मतदारसंघातून आपण सहाव्यांदा निवडून येईल. भाजप आघाडी सरकारचे काम चांगले सुरु असून हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही पर्रीकर यांनी बोलून दाखवला.  
दरम्यान, काँग्रेस पक्षातर्फे माजीमंत्री बाबूश मोन्सेरात यांना काँग्रेसच्यावतीने पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अलिकडेच झालेल्या निवडणूकीत बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसच्या पाठींब्याने अपक्ष म्हणून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी त्यांचा अवघ्या १ हजार मतांनी पराभव केला होता.    बाबूश मोन्सेरात यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तूर्त काँग्रेसला बाबूश सोडून पणजीसाठी एकही प्रबळ उमेदवार नसल्याने बाबूश यांना परत सन्मानाने काँग्रेसमध्ये बोलावून पणजीची उमेदवारी देण्याची आँफर केली आहे. बाबूश यांनी अद्याप आपला निर्णय कळवलेला नाही.   पणजी मतदारसंघातून आपण सहाव्यांदा निवडून येईल. भाजप आघाडी सरकारचे काम चांगले सुरु असून हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही पर्रीकर यांनी बोलून दाखवला.   पुढील स्लाइडवर वाचा, पर्रीकरांचा अश्वमेध रोखणार: गोवा सुरक्षा मंच....

Loading...

Recommended


Loading...