Loading...

गोव्यात पर्यटकांना अनुभवता येईल वॉटर राफ्टिंगचा थरार

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पावसाळी साहस उपक्रमांतर्गत दरवर्षी 'वॉटर राफ्टिंग'चे आयोजन करण्यात येते.

Divya Marathi Jun 30, 2017, 18:14 IST
(संग्रहित फोटो)
गोवा - गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पावसाळी साहस उपक्रमांतर्गत दरवर्षी 'वॉटर राफ्टिंग'चे आयोजन करण्यात येते. यावर्षीही म्हादई नदीवर हा व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार रोज 2 वेळा अनुभवता येणार आहे.    पहिल्या टीमला सकाळी 9.30 वाजता आणि दुसऱ्या टीमला दुपारी 2.30 वाजता अशी राफ्टिंग करण्याची संधी मिळणार आहे. म्हादईतील हा थरार 10 किलोमीटरचा असून राफ्टिंग करताना निसर्गाचे विलोभनीय दर्शन पर्यटकांना घेता येईल. पावसाळी पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी  गोव्यात येणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 2012 साली या व्हाईट वॉटर राफ्टिंग उपक्रमाची जीटीडीसीकडून सुरुवात करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांत पर्यटकांबरोबरच स्थानिकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जून व सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत राफ्टिंगचे आयोजन केले जाते. दरवर्षी दीड ते दोन हजार लोक राफ्टिंगचा आनंद लुटतात.  यामधे एकावेळी प्रशिक्षित मार्गदर्शकासह किमान सहा प्रवासी यात सहभागी होऊ शकतात. व्हाइट वॉटर राफ्टिंग उपक्रम आंतरराष्ट्रीय नियमांनुसार राबवला जातो.   प्रशिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून या उपक्रमात सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशाला तज्ज्ञांकडून माहितीपर सत्र आणि त्यानंतर लाईफ जॅकेट्स, पॅडल्स हे साहित्य दिले जाते. राफ्टिंगसाठी निघण्यापूर्वी सुरक्षा व इतर नियमांची माहिती दिली जाते. देश-विदेशातील पर्यटकांची व्हाइट वॉटर राफ्टिंगला पसंती मिळत आहे.

Loading...

Recommended


Loading...