Loading...

गोवा: विमानतळ परिसरातील शहांच्या सभेचे प्रकरण तापले, काँग्रेसचा विमानतळ संचालकांना घेराव

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा दाबोळी विमानतळ परिसरात घेतल्याचे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Divya Marathi Jul 03, 2017, 15:11 IST
गोवा- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा दाबोळी विमानतळ परिसरात घेतल्याचे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज आणि राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्यासह आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे.
काँग्रेसने हा मुद्दा गंभीरपणे घेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने आज दाबोळी विमानतळ संचालकांना घेराव घालून विमानतळ परिसरात झालेल्या शहा यांच्या सभेबद्दल जाब विचारला. त्यावर विमानतळ संचालकांनी शहा यांच्या सभेसाठी भाजपने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी ही माहिती दिली आहे.

Loading...

Recommended


Loading...