Loading...

मोदी सरकारच्या 3 वर्षांत दहशतवादी हल्ल्यात 62 काश्मीरींचा मृत्यू 183 जवान शहीद - केंद्र सरकार

दहशतवादी हल्ल्यांमध्ये 183 जवान शहीद झाले तर 62 काश्मीरी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

Divya Marathi Oct 11, 2017, 16:21 IST
मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात काश्मीरमध्ये 59 नागरिकांचा मृत्यू झाला तर 105 जवान शहीद झाले.
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या काळात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 183 जवान शहीद झाले तर 62 काश्मीरी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. एका आरटीआयला दिलेल्या उत्तरात केंद्र सराकरने ही माहिती दिली आहे. हे आकडे मे 2014 ते मे 2017 पर्यंतचे आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रंजन तोमर यांनी गृहमंत्रालयाला दहशतवादासंबंधी चार प्रश्न विचारले होते.    चार प्रश्नांना गृह मंत्रालयाने दिले हे उत्तर 
Q.1- मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात किती दहशतवादी हल्ले झाले? 

- मे 2014 ते मे 2017 दरम्यान 812 दहशतवादी घटना घडल्या. त्यामध्ये 62 नागरिक मारले गेले आणि 183 जवान शहीद झाले.    Q.2- मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात किती दहशतवादी घटना घडल्या ?
- मे 2011 ते मे 2014 दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये 705 दहशतवादी घटना घडल्या. त्यात 59 नागरिकांचा मृत्यू झाला तर 105 जवान शहीद झाले.    Q.3- मनमोहन सरकारने दहशतवादी घटना रोखण्यासाठी शेवटच्या तीन वर्षांत किती निधी खर्च केला? 
- मनमोहनसिंग सरकारच्या काळात गृहमंत्रालयाने 850 कोटी रुपये निधी दहशतवादी घटनांशी मुकाबला करण्यासाठी  खर्च केला.    Q.4 - मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या तीन वर्षात दहशतवादी घटना रोखण्यासाठी किती निधी खर्च केला? 
- सरकारने 1,890 कोटी रुपये खर्च केले. हा आकडा मे 2014 ते मे 2017 पर्यंतचा आहे.      

Loading...

Recommended


Loading...