Loading...

अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिकसंबंध बलात्कारच, 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या SCचा निर्णय

अल्पवयीन पत्नी अर्थात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध हा बलात्कारच असल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्णय.

Divya Marathi Oct 12, 2017, 10:03 IST
नवी दिल्ली - वैवाहिक बलात्कारासंबंधी आणि एकूणच विवाह संस्थेबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्त्वाचा निकाल दिला आहे. अल्पवयीन पत्नी अर्थात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध हा बलात्कारच असल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. भारतीय दंड विधान कलम 375 नुसार अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध हे बलात्कर ठरत नाही, हा अपवाद आहे. हा नियमच सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरविला आहे. त्यामुळे आता 15 ते 18 वर्षे वयाच्या पत्नीसोबतचे पतीने शारीरिक संबंध ठेवले तर तो बलात्काराचा गुन्हा ठरणार आहे. त्यासाठी पत्नीला एकावर्षाच्या आत तक्रार देता येणार आहे.  कोर्टाने म्हटले आहे, की अशा प्रकरणात पत्नीने एकावर्षाच्या आत तक्रार दिली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. 
  पुढील स्लाइडमध्ये 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Loading...

Recommended


Loading...