Loading...

हे आहेत भारताचे गरुड कमांडोज, शत्रूच्या अशा उडवतात चिंधड्या

पंजाबमधील पठानकोट येथे शनिवारी एअरबेसवर झालेला दहशतवादी हल्ला हाणून पाडण्यात वायुसेनेच्या गरूड कमांडोंनी महत्वाची भुमिका

Divya Marathi Oct 11, 2017, 16:06 IST
नवी दिल्ली-  जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे हाजिन भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत इंडियन एअरफोर्समधील गरुड फोर्सचे 2 कमांडो शहीद झाले आहे. त्यात साक्री येथील मिलिंद किशोर खैरनार यांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.    गरूड कमांडो हे स्पेशल फोर्स असतात. आपत्तीच्या काळात गरूड कमांडो फक्त जमीनीवरच नाही तर आकाशात आणि पाण्यातही कोणतीही मोहीम फत्ते करून शत्रुला त्याच्या घरात घुसून ठार करतात.
अशी असते गरूड कमांडोची ट्रेनिंग....?
गरूड कमाडो बनण्यासाठी आडीच वर्षाची कडक ट्रेनिंग देण्यात येते. या ट्रेनिंगमध्ये कमांडोंना उसळती नदी, भडकलेल्या आग्नीच्या ज्वाळांमधून जावे लागते. तसेच कोणताही सहारा न घेता डोंगरावर चढाई करावी लागते. याशिवाय मोठ्ठे ओझे घेऊन अनेक किलोमीटरपर्यंत पळणे आणि जंगलात रात्र घालवणे यासारखे टास्क पुर्ण करावे लागतात. भारतीय वायुसेनेत जवळपास 2 हजार गरुड कमांडो आहेत.
स्पेशल ऑपरेशनसाठी असताता गरूड कमांडो...
ही ट्रेनिंग एवढी अवघढ असते, की अर्धे ती मध्येच सोडून देतात. आत्याधुनिक हत्यारांसह या कमांडोंना हवाई क्षेत्रात हल्ला करणे, शत्रुचा छडा लावणे, हवाई आक्रमण करणे यासह स्पेशल कॉम्बॅट आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी तयार करण्यात येते.
बलाढ्य स्पेशल फोर्स...
गरूड कमांडो ही भारतातील एक बलाढ्य स्पेशल फोर्स असून यात सर्व कमांडो हे यंगस्टर्सं असतात. 2003 मध्ये गरूड कमांडो फोर्स बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 6 फेब्रुवारी 2004 ला ही फोर्स वायुसेनेत समाविष्ट करण्यात आली.
असा करतात हल्ला...
सामान्यत: चार गरूड कमांडो मिळून एक छोटा ग्रुप बनवतात. या ला ट्रॅक असे म्हणतात. चार-चार कमांडो मिळून असे तीन ट्रॅक बनवण्यात येतात. पहिल्या ट्रॅक शत्रुंवर हल्ला करतो, यावेळी कमान नंबर दोन कडे असते. तेवढ्यात नंबर तीनवर असेला ग्रुप टेलिस्कॉपिक गनने हल्ला करतो. तर शेवटचा ग्रुप आत्याधुनीक शस्त्रांसह हल्लाबोल करतात. ही युद्धात पुढे जाण्याची पद्धत असते. या पद्धतीला पिलर असे म्हणतात.   पुढील स्लाइडवर वाचा, हे आहेत गरुड कमांडोंचे वैशिष्ट्य...

Loading...

Recommended


Loading...