Loading...

दिवाळीचे दिवे कुंभाराकडून खरेदी करा, त्याच्या घरातही दिवाळीचा आनंद येईल - नरेंद्र मोदी

जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबी भारत छोडो अभियान सुरु केले.

Divya Marathi Oct 11, 2017, 16:28 IST
मोदी म्हणाले आता शौचालयाचे नाव इज्जत घर झाले आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि समाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले, महात्मा गांधींच्या विचारांचा धागा पकडून नानाजी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी पुढे वाटचाल केली. अनेक बड्या नेत्यांनी सत्तेत सहभाग मिळवला मात्र जयप्रकाश नारायण यांनी स्वतःला कायम सत्तेपासून दूर ठेवले आणि देशासाठी काम केले.    आणखी काय म्हणाले मोदी 
- जेपींनी देशातील भ्रष्टाचाराविरोधात युद्ध पुकारले होते. जेपींच्या आंदोलनाने दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना हलवून टाकले होते.
- जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची एक आठवण मोदींनी सांगितली. ते म्हणाले, एका कार्यक्रमात जेपींवर फार मोठा हल्ला झाला. तेव्हा शेजारीच नानाजी उभे होते. त्यांनी एक वार स्वतः झेलला. त्यांच्या हात मोडला, मात्र त्यांनी हल्ल्यातून जेपींना वाचवले होते.    गरीबी हटाओ 
- मोदी म्हणाले ज्या सुविधा शहरात मिळतात त्याच ग्रामीण भारतालाही मिळाल्या पाहिजे. 
- गावागावात अनेक प्रकारचे सामर्थ्य आहे, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. आम्ही ग्रामीण विकासाच्या योजना वेळेत आणि शत प्रतिशत पूर्ण केल्या तर हे शक्य आहे. 

Loading...

Recommended


Loading...