Loading...

दिल्लीच्या तरुणाने अॅमेझॉनला घातला 50 लाखांचा गंडा, ऑनलाइन कंपनीला या ट्रिकने फसवले

नॉर्थ-वेस्ट दिल्लीतून 2 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखो रुपायांचा गंडा घातला

Divya Marathi Oct 12, 2017, 18:34 IST
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी नुकतेच अशा आरोपीला जेरबंद केले आहे ज्याने 166 मोबाइल फोन्सची चोरी करुन अमेझॉनला चुना लावला आहे. नॉर्थ-वेस्ट दिल्लीतून 2 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखो रुपायांचा गंडा घातला आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव शिवम आहे, त्याच्याकडे 166 महागडे फोन, 150 सीम कार्ड आणि काही गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली आहेत.    आरोपी फक्त 21 वर्षांचा 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार मुख्य आरोपी शिवम 21 वर्षांचा आहे. त्याने अॅमेझॉन कडून 166 मोबाइल खरेदी केले आणि रिकामा डब्बा मिळाल्याची तक्रार करत पैसे रिफंड घेतले.
- हा अजब फंडा वापरणाऱ्या शिवमने यावर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 50 लाख रुपये कमावले होते. 
- अॅमेझॉनला एका फ्रॉडची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली त्यानंतर तपासात शिवमचा कारनामा समोर आला.    आरोपी हॉटेल मॅनेजमेंटचा स्टूडंट 
- आरोपी शिवम दिल्लीतील एका संस्थेत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत आहे. 
- तो नोकरी देखील करत होता. त्याने अनेक ठिकाणी नोकरी केली मात्र कुठेच त्याचे मन लागले नाही. 
- मार्चमध्ये त्याने ऑनलाइन मोबाइल खरेदी करुन रिफंड मिळवण्याचा प्लॅन तयार केला. 
- एक-दोन वेळा रिफंड मिळाल्यानंतर त्याने हा कित्ता वारंवार गिरवण्यास सुरुवात केली. यातून घरबसल्या त्याने लाखो रुपये कमावले. 
- पुढील काही महिने त्याने ऑनलाइन फोन खरेदी करणे आणि रिकामा बॉक्स असल्याचा बनाव रचून पैसे रिफंड मिळवले.

Loading...

Recommended


Loading...