Loading...

आरुषी मर्डर केस : तत्काळ सुटकेचे आदेश, मग उशिर का? तलवार दाम्पत्याचा तुरुंगात सवाल

शनिवार आणि रविवार हे दोन्ही सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे आता सोमवारीच तलवार दाम्पत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

Divya Marathi Oct 14, 2017, 15:05 IST
गाझियाबाद - आरुषी मर्डर केसमध्ये तिचे आई-वडील नूपुर - राजेश तलवार यांना सोडण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतरही ते अजून जेलमध्ये आहेत. शुक्रवारी दिवसभर ते, आम्हाला अजून का सोडले जात नाही, याची तुरुंग प्रशासनाकडे विचारणा करत होते. हायकोर्टाने त्वरीत सोडण्याचे आदेश दिलेले असताना तुरुंगातून सुटका होण्यास उशिर का होत आहे, यावर त्यांना एकच उत्तर मिळत होते. हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप आम्हाला मिळाली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तुरुंग प्रशासनाकडे आदेशाची प्रत आली नव्हती. शनिवार आणि रविवार हे दोन्ही सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे आता सोमवारीच तलवार दाम्पत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.    शुक्रवारी राजेश तलावारने दुप्पट पेशंट तपासले 
- आरुषीच्या माता-पित्यांना शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका होणार अशी आशा होती. त्यासाठी त्यांनी तुरुंगातील त्यांचे बाड-बिस्तर गुंडाळून ठेवले होते. सोबत 70 पुस्तकांचीही बांधाबांध करुन ठेवली होती. 
- शुक्रवारी सायंकाळी तुरुंग अधिकारी दधिराम मौर्य यांनी त्यांना कळवले की हायकोर्टाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आता सोमवारीच सुटका होण्याची शक्यता आहे. हे एकल्यानंतर राजेश आणि नूपुर तलवार नाराज झाले.
- त्याआधी शुक्रवारी दिवसभर दोघेही उत्साहात होते. डॉ. राजेशने रोजच्यापेक्षा दुप्पट पेशंट पाहिले. रोज सकाळी 10 वाजता तुरुंगातील हॉस्पिटलमध्ये पोहोचणारा राजेश शुक्रवारी 8 वाजताच हजर झाला होता. त्याने 44 पेशंट तपासले. 
- कैद्यांना जेव्हा कळाले की डॉ. राजेशची सुटका होणार आहे, तेव्हा अनेक कैदी दंतचिकित्सेसाठी आले होते. 2 कैद्यांचे त्याने ऑपरेशनरही केले. 
- सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान तुरुंग अधीक्षकांनी अनेकवेळा राजेश तलवारची भेट घेतली. 

Loading...

Recommended


Loading...