Loading...

252 जर्जर पुलांवरून रेल्वे गाड्यांच्या वेगावर निर्बंध नाही; देशातील सर्व पुलांचे होणार ऑडिट

रेल्वे मंडळाने देशातील सर्व पुलांची बळकटी तपासणी व दुरुस्तीसाठी पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश जारी

Divya Marathi Oct 21, 2017, 23:17 IST
नवी दिल्ली- रेल्वे मंडळाने देशातील सर्व पुलांची बळकटी तपासणी व दुरुस्तीसाठी पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश जारी केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कमकुवत असलेल्या २७५ पुलांवरून गाडीला वेगाने जाऊ देण्यावर मनाई नसल्यावरून तक्रारी असल्याच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्ड म्हणाले, सीबीईने आेआरएन-१ व आेआरएन-२ श्रेणीतील सर्व पुलांच्या स्थितीचे परीक्षण करणे आवश्यक आहे. त्याच्या आधारे पुढील कृती आराखडा तयार केला जावा. काही विभागात दीर्घ काळापासून पुलांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न सुटलेला नाही. मध्य रेल्वेत ६१, पूर्व-मध्य रेल्वेत ६३, दक्षिण-मध्ये रेल्वेत ४१ व पश्चिम रेल्वेत ४२ पुलांच्या पुनर्बांधणीचे काम रखडलेल्या स्थितीत आहे.  
२७५ कमकुवत पूल  
देशात दुरुस्तीची गरज असलेल्या २७५ रेल्वे पुलांपैकी २३ पुलांवरून वेगाने गाडी नेण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या रेल्वे पुलांच्या स्थितीवर आधारित अहवालातून समोर आली आहे. २५२ रेल्वे पुलांवरून गाडी सामान्य वेगात जाऊ शकते. हे पूल अतिशय जुने आहेत. त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यावरून गाडी वेगाने जाऊ शकत नाही.     रेल्वे पुलांना तीन श्रेणी  
रेल्वे पुलांचे तीन श्रेणीत विभाजन करण्यात आले आहे. त्यात आेआरएन-१, २,३ यांचा समावेश होतो. त्यात आेआरएन-१ श्रेणीच्या पुलांची तत्काळ दुरुस्ती किंवा ते बदलण्याचे संकेत देणारे आहे. आेआरएन-२ श्रेणीनुसार निश्चित कार्यक्रमानुसार अशा पुलांचे पुनर्बांधकाम करणे आवश्यक आहे. आेआरएन-३ अंतर्गत येणाऱ्या पुलांना देखभालीची गरज आहे.  

Loading...

Recommended


Loading...