Loading...

‘कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी घटनात्मक अधिकार व संपत्ती’

कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी त्याची संपत्ती व घटनात्मक अधिकार आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Divya Marathi Mar 26, 2017, 04:43 IST
बिलासपूर - कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी त्याची संपत्ती व घटनात्मक अधिकार आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा हवाला देऊन न्या. प्रीतिंकर दिवाकर व न्या. संजय अग्रवाल यांनी म्हटले की, कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर सरकार पेन्शन व ग्रॅच्युइटी बक्षीस म्हणून वाटत नाही. ते देण्यास उशीर झाल्यास बाजारभावासह दंडाच्या रकमेसह ती दिली पाहिजे. एलईसीएलमधील एका कर्मचाऱ्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

Loading...

Recommended


Loading...