Loading...

छत्तीसगड: मेहुणीशी प्रेमसंबंध; पाच जणांची कुऱ्हाडीने हत्या

छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यात एका युवकाने मेहुणीशी असलेल्या प्रेम प्रकरणातून रविवारी पाच जणांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. मृतांत त्याची पत्नी, मुलगी, सासू, सासरा आणि त्याच्या एका मित्राचाही समावेश आहे.

Divya Marathi May 15, 2017, 03:01 IST
अंबिकापूर : छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यात एका युवकाने मेहुणीशी असलेल्या प्रेम प्रकरणातून रविवारी पाच जणांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. मृतांत त्याची पत्नी, मुलगी, सासू, सासरा आणि त्याच्या एका मित्राचाही समावेश आहे.  
पोलिसांनुसार, मैनपाटमधील सपनादारमध्ये संजय मांझी या युवकाने पत्नी, मुलीसह सासू, सासरा आणि त्याचा मित्र मंगल यांना ठार मारले. आरोपीचे मेहुणीशी प्रेमप्रकरण सुरू होते, असे सांगण्यात आले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला होता. वाद-विवाद सुरू असतानाच त्याने पाचही जणांना कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले आणि फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Loading...

Recommended


Loading...