Loading...

लुधियानातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांच्या शोधात कैमुरला गेले पंजाब पोलिस

लुधियानातून पळून गेलेल्या एका प्रेमी युगुलाच्या शोधार्थ पंजाब पोलिस शुक्रवारी सकाळी बिहारमधील कैमुर येथे दाखल झाले.

Divya Marathi Apr 29, 2017, 03:00 IST
भभुआ (बिहार)- लुधियानातून पळून गेलेल्या एका प्रेमी युगुलाच्या शोधार्थ पंजाब पोलिस शुक्रवारी सकाळी बिहारमधील कैमुर येथे दाखल झाले. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील शिमलापुरी पाेलिस ठाण्याचे सहायक फौजदार जसपाल सिंग, हेड कॉन्स्टेबल हरदेव सिंग व महिला हवालदार हरमीरसिंग यांनी पोलिस भभुआ पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाच्या गावात छापे टाकले. मात्र यात पंजाब पोलिसांना यश मिळाले नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील दिनारा पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या तरुणीचे नीबी गावच्या राजेंद्र राम या तरुणावर प्रेम होते. हा तरुण पंजाबमध्ये नोकरीस होता. त्या दोघांचा आधी परिचय झाला. त्यानंतर त्यांचे प्रेमात रुपांतर झाले.  २८ मार्च रोजी ते दोघेही पळून गेले होते. मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन बिहारच्या तरूणावर गुन्हा दाखल झाला.     

Loading...

Recommended


Loading...