Loading...

प्रेयसींसाठी महामार्गावर वाहने लुटणारा अभियंता

दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी एका अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले, अशी माहिती हाती आली आहे.

Divya Marathi Feb 24, 2017, 03:15 IST
मुजफ्फरपूर (बिहार) - दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी एका अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले, अशी माहिती हाती आली आहे. आंतरराज्य टोळीतील पाच कुख्यात दरोडेखोरांना मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे पकडण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक विवेककुमार यांनी ही महिती दिली.   पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे. सतत लुटीच्या घटना वाढत गेल्याने एक विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे सिनेमा चौकात विपिनकुमार  या तरुणास अटक केली, असे एएसपी यांनी सांगितले.

Loading...

Recommended


Loading...