Loading...

बिहारमध्ये व्यसनमुक्तीसाठी 3 कोटींची मानवी साखळी

बिहारमध्ये शनिवारी ३ कोटी नागरिकांनी एकमेकांच्या हातात हात घालून विक्रमी ११,४०० किमी लांब जगातील सर्वात मोठी मानवी साखळी निर्माण केली. यासोबत बिहारने जगाला दारूबंदी व व्यसनमुक्तीचा तगडा संदेशही दिला.

Divya Marathi Jan 22, 2017, 04:27 IST
पाटणा : बिहारमध्ये शनिवारी ३ कोटी नागरिकांनी एकमेकांच्या हातात हात घालून विक्रमी ११,४०० किमी लांब जगातील सर्वात मोठी मानवी साखळी निर्माण केली. यासोबत बिहारने जगाला दारूबंदी व व्यसनमुक्तीचा तगडा संदेशही दिला. बिहारच्या लोकसंख्येच्या हिशेबाने प्रत्येक चौथा व्यक्ती, दारू व व्यसनाधिनतेविरुद्ध मानवी साखळीत सहभागी झाला होता.   लिम्का  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने या विक्रमाची नोंद घेतली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संबंधितांनी इथे येऊन ठरवावे,अशी प्रतिक्रिया दिली. गांधी मैदानावरील कार्यक्रमात राजद प्रमुख लालुप्रसाद यादव यांचीही उपस्थिती हाेती.   उत्सवी वातावरण
मानवी साखळी दुपारी १२.१५ पासून ते १.०० वाजेपर्यंत होती, मात्र सकाळपासून दुपारी ३-४ पर्यंत रस्त्यांवर उत्सवी वातावरण होते. मुलांच्या हातात दारूबंदी व व्यवसनमुक्तीचा संदेश देणारी पोस्टर्स होती. “बेटी करे गुहार, पापा मदिरा है बेकार ।, शराब छोडी मिली खुशी, मुन्ना-मुन्नी दोनों सुखी ।’ आशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. 

Loading...

Recommended


Loading...