Loading...

जलपर्णीमुळे पंचगंगा नदीला मैदानाचे रुप..शिवसेनेकडून प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूरातील पंचगंगा नदी पात्रात प्रदूषणामुळे हिरवीगार जलपर्णी पसरल्याने नदीला मैदानाचे स्वरूप आले आहे.

Divya Marathi Jun 19, 2018, 10:52 IST

कोल्हापूर- पंचगंगा नदी पात्रात प्रदूषणामुळे हिरवीगार जलपर्णी पसरल्याने नदीला मैदानाचे स्वरूप आले आहे. ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने चक्क पंचगंगेच्या जलपर्णी मैदानात प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. 


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील प्रदूषित पंचगंगेच्या काठावरील 28 गावांनी आंदोलन सुरू केले आहे. चार पाच दिवसांपूर्वी हातकणंगले गावच्या कोळी बांधवांनी नदी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यामुळे पोलिसही गोंधळून गेले होते.

 

आता तर जलपर्णीच्या विळख्यात सापडलेल्या पंचगंगेच्या नदीपात्रात चक्क जागतिक फुटबॉल स्पर्धा आयोजित करून शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वाभाडे काढले. विशेष म्हणजे शिवसेनेने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देखील या उदघाटन सोहळ्याला आमंत्रित केले आणि ते अधिकारी सुद्धा उपस्थित राहिले. अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा अहवाल शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले. 


Loading...

Recommended


Loading...