Loading...

ACCIDENT: कोल्हापुरात स्कूल बस-कंटेनरची भीषण धडक; 2 ठार, 26 विद्यार्थी जखमी

संजय घोडवत इंग्लिश स्कूलच्या बसला अतिग्रे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने बसला जोरदार धडक दिली.

Divya Marathi Jun 26, 2018, 14:15 IST

कोल्हापूर- संजय घोडवत इंग्लिश स्कूलच्या बसला अतिग्रे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूल बसमधील 26 विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळी हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

सूत्रांनुसार, स्कूल बस अतिग्रे फाट्यावरून शाळेकडे जात असताना सांगलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकून समोरुन येणार्‍या स्कूलबसला धडकला. बस चालकाने प्रसंगावधान राखून वाहन शेजाच्या शेतात वळवल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.


अपघाताची माहिती मिळताच पालकांनी अपघातस्थळी धाव घेतली.घाबरलेल्या मुलांना बसमधून खाली उतरवण्यात आले. अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जयसिंगपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... स्कूलबस आणि कंटेनरच्या अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

 

 


Loading...

Recommended


Loading...