Loading...

Kolhapur: राष्ट्रवादीकडून 'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर'ची खिल्ली; वक्त्यांनी घेतले तोंडसुख

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात \'आऊट स्टँ

Divya Marathi Jun 21, 2018, 16:05 IST

कोल्हापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 'आऊट स्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट' पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले. मुख्यमंत्र्यांचा अमेरिकेत गौरव होत असेल तर महाराष्ट्रातही व्हायलाच हवा, या भावनेतून आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात 'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर' हा पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.

 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामेश्वर पत्की यांना प्रतिकात्मक देवेंद्र फडणवीस म्हणून व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रामेश्वर पत्की यांना  'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रामेश्वर पत्की यांनी सत्काराला दिलेल्या उत्तराला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हसून-हसून लोटपोट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाला गेल्या चार वर्षांत त्यांनी फासलेल्या हरताळी विरोधात सर्व वक्त्यांनी तोंडसुख घेतले.

 

नंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी.पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,  आर.के. पवार, शहराध्यक्ष राजू लाटकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...कोल्हापुरात राष्ट्रवादीकडून 'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर'ची खिल्ली उडवणारे फोटो आणि व्हिडिओ...

 


Loading...

Recommended


Loading...