Loading...

कोल्हापुरातील मुस्लिम समाजाचा मानवी साखळी बनवून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Divya Marathi Jul 26, 2018, 18:07 IST

कोल्हापूर- मागील तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाने ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गुरुवारी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर शोभा बोन्द्रे या उपस्थित होत्या.

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची एकमुखी मागणी केली.

 

मानवी साखळी बनवून मुस्लिम समाजाचा मराठ्यांना पाठिंबा..

मुस्लिम बोर्डिंग आणि कोल्हापुरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मुस्लिम समाजाने मानवी साखळी बनवून आपला पाठिंबा दिला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...कोल्हापुरच्या परंपरेला साजेशा आणि अतिशय शांततेत सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ..


Loading...

Recommended


Loading...