Loading...

ACCIDENT: कोल्‍हापूरात खासगी बस उलटली; एक जण जागेवरच ठार, 15 महिला जखमी

खासगी बेकरीच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जाणारी बस उलटल्याने एक जण ठार तर 15 महिला जखमी झाल्या.

Divya Marathi Jul 12, 2018, 15:24 IST

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यात एका खासगी बेकरीच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जाणारी बस उलटल्याने एक जण ठार तर 15 महिला जखमी झाल्या आहेत. कुरुंदवाड जवळ भैरेवाडी नांदणी रस्त्यावर आज (गुरूवारी) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात काशीनाथ बेरड (28) हा युवक जागेवरच ठार झाला. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 


आज सकाळी नांदणी येथील गणेश बेकरीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बसमध्ये एकूण 40 जण होते. कुरुंदवाडपासून सुमारे 5 किलोमीटरवर असलेला अरुंद पूल ओलांडताना चालक दत्ता बले याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या शेतात बस घुसली आणि उलटली.

 

या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड याचा जागेवरच मृत्यू झाला. तर बसमधील 15 महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसचा मालक सुरज लकडे याने ही बस गणेश बेकरीला भाडेतत्त्वावर दिली होती असे समजते.


पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे भीषण फोटो... 

 

 


Loading...

Recommended


Loading...