Loading...

अहमनदगनर: स्कूल बस उलटून 15 मुले जखमी

वाकडी-गणेशनगर रस्त्यावरील हॉटेल गारवासमोर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या बसचे (एम एच १७ ए जी ७३९८) पाटे तुटल्याने

Divya Marathi Jul 01, 2018, 11:48 IST

राहाता - वाकडी-गणेशनगर रस्त्यावरील हॉटेल गारवासमोर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या बसचे (एम एच १७ ए जी ७३९८) पाटे तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस विजेच्या खांबास धडकून पलटी झाली. सुदैवाने वीजप्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात १५ विद्यार्थी जखमी झाले.


ग्रामस्थ बाळासाहेब लहारे, माजी जि. प. सदस्य राजेंद्र लहारे, संदीप लहारे, जि. प. सदस्य कविता लहारे, शोभा घोरपडे आदींनी मुलांना बसमधून बाहेर काढले. जखमींना वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही विद्यार्थी शाळेत, तर काही घरी गेले. जास्त मार लागलेल्या मुलांपैकी वैभव लोंढे, प्रफुल्ल काळे, संस्कार शेळके, अथर्व चोळके व शिक्षिका सुरेखा लोंढे यांना श्रीरामपूर येथील संत लुक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काहींच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. गोदावरी कालव्याच्या पुलापासून गणेशनगरपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब आहे. जुना पूल तकलादू बनला अाहे.


Loading...

Recommended


Loading...