Loading...

नागपुरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार, हाय स्पीड रेल्वेसमोर आंदोलन

आंदोलक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत विरोधात जोरदार नारेबाजी केली.

Divya Marathi Aug 10, 2018, 07:55 IST

 नागपूर- सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आयोजित नागपूर बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाल, इतवारी, गांधीबागसह बहुतांश भागात व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाले. पण तुरळक प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. दरम्यान मानकापूर येथे काही आंदोलकांनी हाय स्पीड रेल्वेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

     
साडेबारा ते पाऊण वाजताच्या सुमारास काही आंदोलकांनी मानकापूर उड्डाणपुलावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी रास्ता रोको करू न दिल्यामुळे अचानक आंदोलकांनी जवळच्या रेल्वे रूळाकडे धाव घेतली. त्याच वेळी येत असलेल्या हाय स्पीड रेल्वे गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मानकापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित आंदोलकांना रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजूला खेचले. त्यामुळे दोन ते तीन आंदोलकांचे जीव वाचले. या प्रकरणी पोलिसांनी दहा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.      


मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार
आंदोलक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास बांगड्यांचा हार घालत नारेबाजी केली. बांगड्यांचा हार घालून मिरवणूक काढणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला. ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. महाल भागातील नगरभवनात पालकमंत्र्यांनी पत्रपरिषद बोलावली होती. काही मराठा आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. आंदोलक संतप्त झाल्याने ऊर्जामंत्री बावनकुळे पोलिसांच्या मदतीने तेथून कसेबसे बाहेर पडले.

 

पोलिसांमुळे वाचला आंदोलकांचा जीव
साडेबारा ते पाऊण वाजताच्या सुमारास काही आंदोलकांनी मानकापूर उड्डाणपुलावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी रास्ता रोको करू न दिल्यामुळे अचानक आंदोलकांनी जवळच्या रेल्वे रूळाकडे धाव घेतली. त्याच वेळी येत असलेल्या हाय स्पीड रेल्वेगाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मानकापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित आंदोलकांना रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजूला खेचले. त्यामुळे दोन ते तीन आंदोलकांचे जीव वाचले. या प्रकरणी पोलिसांनी दहा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.  

 

बस निघाल्याच नाहीत   
नागपुरातून परिवहन महामंडळाची एकही बस धावली नाही. परिणामी प्रवाशांना परत जावे लागले. या शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शैक्षणिक संस्थांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली.  काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्या. परंतु वेळीच पोलिस पोहोचल्याने घटनांनी गंभीर वळण घेतले नाही. सायंकाळी शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलनाचा समारोप झाला. 

 

पालकमंत्र्यांना आंदोलकांचा घेराव
उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. महाल भागातील नगरभवनात पालकमंत्र्यांनी पत्र परिषद बोलावली होती. काही मराठा आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. आंदोलक संतप्त झाल्याने उर्जामंत्री बावनकुळे पोलिसांच्या मदतीने तेथून कसेबसे बाहेर पडले.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... नागपुरमधील मराठा आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ...


Loading...

Recommended


Loading...