Loading...

महामार्गावर मध्यरात्री 'डान्सिंग' कारमध्ये आढळले युवक युवती; पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहणारी एक युवती व अभिंयांत्रीकीचे शिक्षण पूर्ण झालेला एक युवक बडनेरा ते अकोला

Divya Marathi Jul 13, 2018, 12:51 IST

अमरावती- स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहणारी एक युवती व अभिंयांत्रीकीचे शिक्षण पूर्ण झालेला एक युवक बडनेरा ते अकोला महामार्गावर बुधवारी (दि. ११) मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास (डान्सिंग) कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांना सापडले. बडनेरा पाोलिसांनी या दोघांनाही ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 


बडनेरा ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी बुधवारी मध्यरात्री ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. दरम्यान गस्त घालणारे पथक अकोला महामार्गाने जात असताना बडनेरापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर एक कार रस्त्याच्या कडेला उभी होती. कार हालत असल्याने पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी या 'डान्सिंग' कारजवळ जाऊन त्यामध्ये असलेल्यांना आवाज दिला. त्यावेळी कारमधील लाईट बंद होता. त्यामुळे पोलिसांनी कोण आहे, विचारताच आतमध्ये असलेल्या युवकाने अावाज न देता किंवा कारचा काच न उघडता काही क्षणातच कार सुरू केली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी काही अंतरावरच कार पकडली. त्यावेळी कारमध्ये एक युवक व युवती आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांना आढळून आले. त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता युवक इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेला असून, बडनेराचा रहिवासी तर युवती जिल्ह्यातीलच एका गावातील असून ती शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत असल्याचे पोलिसांना त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी त्या दोघांना पकडले असता त्या युवतीने थेट शहरात कार्यरत एका पोलिस उपायुक्तांना फोन लावला. आमच्यावर कारवाई कशी करता, असा सवाल युवतीनेच पोलिसांना केला होता. बडनेरा पोलिसांनी दोघांनाही ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, 'पीके' चित्रपटफेम डान्सिंग कारप्रमाणे या अमरावती शहरातील डान्सिंग कारची चर्चा पोलिस ठाणे परिसरात होती. 


युवक, युवतीस केले पालकांच्या स्वाधीन 
गस्त घालणाऱ्या पथकाला बुधवारी मध्यरात्री एका कारमध्ये एक युवक व युवती आक्षेपार्ह स्थितीत सापडले. त्या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी त्यांना समज दिली आहे. 
- शरद कुलकर्णी, ठाणेदार, बडनेरा. 

 


Loading...

Recommended


Loading...