Loading...

मालगाडीचे सात डबे घसरले, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकणातील वीर आणि करंजाडी रेल्वेस्थानकांदरम्यान रविवारी सकाळी साडेसहा वाजता मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Divya Marathi Aug 25, 2014, 01:23 IST
मुंबई- कोकणातील वीर आणि करंजाडी रेल्वेस्थानकांदरम्यान रविवारी सकाळी साडेसहा वाजता मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्ववत करण्यास किमान सात तास लागणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अपघात झाल्यानंतर कोकणकडे येणाऱ्या व जाणाऱ्या  सर्वच गाड्या विध रेल्वेस्थानकांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यास किती तास लागतील याबाबत रेल्वेकडून निश्चित वेळ देण्यात आलेली नाही.

Loading...

Recommended


Loading...