Loading...

भय्यू महाराजांच्या आत्महत्येचे महाराष्‍ट्र कनेक्शन; स्वत:वर गोळी झाडलेले रिव्हॉल्वर वाशिमचे

भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. भय्यू महाराजांनी ज्या रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडली, त्याचे

Divya Marathi Jun 22, 2018, 15:42 IST

औरंगाबाद/इंदूर- भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. भय्यू महाराजांनी ज्या रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडली, त्याचे लायसन्स महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील आहे. महाराजांनी नंतर ते लायसन्स स्वत:च्या नावाने बुलढाणा जिल्ह्यात 2012 मध्ये ट्रान्सफर केले होते, ही माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे.

 

भय्यू महाराज यांचे वाशिमशी जवळचे नाते होते. बारसी चाखली हे त्यांचे मूळ गाव. अकोला आणि वाशिम दरम्यान हे गाव आहे. पोलिस रिव्हॉल्वरसह त्यांच्या विसेराची चौकशी करत आहे. विसेरा राऊ येथील फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

 

वाशिममध्ये कायम येत-जात होते भय्यू महाराज...
- भय्यू महाराज कायम वाशिम आणि अकोला येथे येत जात होते. वाशिम येथील मालतीबाई सरनाईक या महाराजांच्या आत्या होत्या. मालतीबाई हयात होत्या तेव्हा त्या महाराष्ट्राच्या राजकारण सक्रीय होत्या. काँग्रेसच्या तिकिटावर त्या महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून गेर्ल्या होते. ऑगस्ट 2011 मध्ये मालतीबाई यांचे निधन झाले. नंतरही भय्यू महाराज आपल्या नातेवाईकांना भेटायला वाशिम जात होते.

 

2001 मध्ये वाशिम बनला स्वतंत्र जिल्हा...
- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील माजी सदस्य आणि वाशिम येथील राहाणारे सुभाष देवहंस यांनी 'दिव्य मराठी डॉट कॉम'ला सांगितले की, सन 2001 मध्ये वाशिम हा स्वतंत्र जिल्हा बनला. वाशिम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव सरनाईक होते. ते भय्यू महाराजांचे खास शिष्य होते. तसेच महाराष्ट्रचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर हे भय्यू महाराजांचे खास मित्र होते. या काळात भय्यू महाराजांनी रिव्हॉल्वरचे लायसन्स घेतले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... डॉ.आयुषीच्या हॉस्टेलमध्ये मिळाले महत्त्वपूर्ण पूरावे...

 


Loading...

Recommended


Loading...