Loading...

दादर रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून उतरताना पडून बांगलादेशी तरुण गंभीर जखमी

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवर प्लॉटफॉर्म क्रमांक 4 वर धावत्या ट्रेनमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Divya Marathi Aug 21, 2018, 15:22 IST

मुंबई- मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवर प्लॉटफॉर्म क्रमांक 4 वर धावत्या ट्रेनमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. हा तरुण बांगलादेशातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

 

तरुण धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना तो प्लॉटफॉर्मवर पडला. प्लॉटफॉर्म असलेल्या लोकांनी त्याला त्याला वाचवले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. तरुणावर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना प्लॉटफॉर्मवर बसवलेल्या कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 


Loading...

Recommended


Loading...