Loading...

औरंगाबादेत आता कचर्‍यावरही TAX; सामान्यांना 365 तर उद्योजकांना 36 हजारांपर्यंत कर

मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडीत अडकलेल्या औरंगाबादकरांना आता कचर्‍यावरही कर (Tax) द्यावा लागणार आहे.

Divya Marathi Aug 06, 2018, 18:14 IST

औरंगाबाद- मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडीत अडकलेल्या औरंगाबादकरांना आता कचर्‍यावरही कर (Tax) द्यावा लागणार आहे. घरासमोर साचलेल्या कचर्‍यावर महापालिकाकडून 'घनकचरा व्यवस्थापन नियम 2016' नुसार नागरिकांकडून ग्राहक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. स्वच्छचा कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा पुरेसा नसल्याचे महापालिकेने म्हणणे आहे. ग्राहक शुल्कातून मिळालेल्या पैसा महापालिका कचरा निर्मूलनासाठी वापरणार आहे.

 

असा कसा असेल कर?

- सामान्य नागरिकांसाठी घरासमोरील कचरा दिवसभरात एक वेळ कचरा उचलण्यात येईल- एक रुपया प्रतिदिन कर- वर्षाला 365 रुपये.

- छोटे व्यावसायिक यांचा कचरा दिवसभरातून दोन वेळा कचरा घेण्यात येईल, प्रतिदिन दोन रुपये कर - वर्षाला 730 रुपये.

- हॉटेल्स, मोठे व्यावसायिक यांच्याकडून प्रतिदिन 10  ते 100 रुपयांपर्यंत कर आकारण्यात येईल.


Loading...

Recommended


Loading...