रोहा (रायगड)- साखर कारखाना खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारां यांनी फेटाळला आहे. सध्या उठसुट आरोप करणे ही आता फॅशन झाली आहे. अशा प्रकारे आरोप करणारे विचारवंत आणि गणित तज्ञ झाल्याचा टोलाही पवारांनी लगावला. फेब्रुवारीमध्ये राज्यसभा निवडणूक लढविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
रोहा येथील पत्रकार परिषदेत बोलत शरद पवार यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. महाराष्ट्रात मोडकळीस आलेल्या साखर कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा झाला, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला होता. त्यानंतर पवारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
शरद पवार म्हणाले, 'सध्या उठसुट आरोप करणे ही आता फॅशन झाली आहे. देशाचे सहकार खातेही माझ्याकडे आहे. मात्र, अशा प्रकारचा घोटाळा झाल्याची आपल्याला माहिती नाही. सहकारामुळे उलट महाराष्ट्राचा विकासच झाला आहे. अशाप्रकारचे आरोप करणारे विचारवंत आणि गणित तज्ज्ञ झाले आहेत, असे पवार म्हणाले.
आणखी काय म्हणाले शरद पवार... वाचा पुढील स्लाईड्समध्ये..