Loading...

ग्रहांच्या अंगठ्या समुद्रात विसर्जित केल्या तेव्हा बरं वाटलं - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्या बिहारमध्ये झालेल्या अटकेवरून उत्तर भारतीयांवर पुन्हा निशाणा साधला आहे.

Divya Marathi Aug 31, 2013, 15:49 IST

ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्या बिहारमध्ये झालेल्या अटकेवरून उत्तर भारतीयांवर पुन्हा निशाणा साधला आहे. दहशतवादी भटकळला बिहारमध्ये आसरा मिळतोच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथील एका कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. याचवेळी अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा बाऊ करु नका, असे सांगत राज यांनी स्वतःच्या अंगठ्या विसर्जित करण्याचा किस्सा सांगितला.  (पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज ठाकरेंनी का केल्या अंगठ्या विसर्जित)

दहशतवादी बिहारमधून पकडला जातो, आणि आम्ही उत्तर भारतीयांविरोधात बोललो की, दोष आम्हाला दिला जातो, असे राज म्हणाले. ते ऐवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी राज्यात वाढत असलेल्या परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप केला. या लोंढ्यांना वेळीच रोखले पाहिजे, तरच गुन्हेगारी थांबेल, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी आहे आणि तिथेच गुन्हेगार व दहशतवाद्यांना आसरा दिला जातो.


Loading...

Recommended


Loading...