Loading...

ठाण्यात मान्सूनची हजेरी, शेतकरी अजूनही तहानलेलाच

ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भाईंदर, वसई, विरार भागात पाऊस दाखल झाला.

Divya Marathi Jul 03, 2014, 10:27 IST
ठाणे - अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली असली तरी, चातकाप्रमाणे वाट पाहात असलेल्या शेतकर्‍याला ताहानलेलेच ठेवले आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भाईंदर, वसई, विरार भागात पाऊस दाखल झाला. तर, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि शहापूर भागात रिमझिम सरी झाल्या आणि थोड्याच वेळात थांबल्या. यामुळे शेतीची कामे अजूनही लांबलेलीच आहेत.  
  ठाणे शहरात झालेल्या पावसाने महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले, तर लोकल रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. वागळे इस्टेट, इंदिरानगर येथे भिंत कोसळली आहे. त्यामुळे चार कारचे नुकसान झाले. 
  वसई - विरारमध्ये बत्ती गुल  पहिल्याच पावसाने ठाणे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली तर, महावितरण आणि बीएसएनल यांच्या अखंड सेवेचे दावेही वाहून गेले. वसई विरार भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहाण्याची वेळ आली. बीएसएनएलची सेवाही कोलमडून पडली यामुळे फोन आणि इंटरनेट सेवा बंद पडली होती. 

Loading...

Recommended


Loading...