Loading...

ठाण्यात गर्भवती महिलेवर अज्ञात दोघांकडून सामूहिक बलात्कार

पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेवर दोन अज्ञात व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शरणापूर तालुक्यात घडली.

Divya Marathi May 22, 2014, 02:14 IST
ठाणे- पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेवर दोन अज्ञात व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शरणापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी महिलेने दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित महिला ही घोटेघर येथील आपल्या घरी एकटीच होती. या वेळी दोघांनी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी तिच्या मदतीसाठी आले. मात्र, तोपर्यंत दोघेही तेथून फरार झाले. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading...

Recommended


Loading...