Loading...

माजी मंत्री मोहन पाटील यांचे निधन

माजी मंत्री मोहन पाटील यांचे दीर्घ आजाराने ठाण्यात गुरुवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षे होते.

Divya Marathi Jul 25, 2014, 01:31 IST
 ठाणे-  माजी मंत्री मोहन पाटील यांचे दीर्घ आजाराने ठाण्यात गुरुवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आमदार धैर्यशील पाटील असा परिवार आहे. कोकणातील पेण या मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार राहिले होते. सध्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र धैर्यशील आमदार आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रिपदावर होते. त्यांच्या निधनामुळे अनेक राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

Loading...

Recommended


Loading...