Loading...

रायगड पोलिसांत Love, Sex आणि धोका, सहकाऱ्यालाच बॉम्ब लावून उडवले

प्रेमात आणि युद्धात सगळे काही क्षम्‍य आहे, असे म्‍हटले जाते. एवढेच नाही तर \'इश्क जब हद से गुजर जाए तो जुनून बन जाता है,\' हे हिंदी गीतही प्रसिद्ध आहे. त्‍यातून प्रेमात बुडालेली व्‍यक्‍ती इतरांचा जीवही घेऊ शकते.

Divya Marathi Oct 30, 2015, 17:07 IST
रायगड - प्रेमात आणि युद्धात सगळे काही क्षम्‍य आहे, असे म्‍हटले जाते. एवढेच नाही तर 'इश्क जब हद से गुजर जाए तो जुनून बन जाता है,' हे हिंदी गीतही प्रसिद्ध आहे. त्‍यातून प्रेमात बुडालेली व्‍यक्‍ती इतरांचा जीवही घेऊ शकते. असाच प्रकार रायडग जिल्‍ह्यात घडला. एका मजनू पोलिस कर्मचाऱ्याने त्रिकोणी प्रेमातून दुसऱ्या आपल्‍याच सहकाऱ्याच्या दुचाकीमध्‍ये बॉम्‍ब लावून त्‍याचा शांत डोक्‍याने खून केला. ही घटना रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी घडली. निकेश पाटील (28) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव तर प्रल्‍हाद पाटील (45) असे आरोपीचे नाव आहे.   दुचाकी सुरू करताना झाला स्‍फोट
निकेश पाटील हे श्रीवर्धन पोलिस ठाण्यात कार्यरत होते.  मात्र, प्रशिक्षणासाठी अलिबाग येथील पोलिस मुख्यालयात आले होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिस मुख्यालयाच्या आवारात उभी असलेली मोटारसायकल निकेश सुरू करताना स्फोट झाला. या स्फोटात निकेश पाटील हा गंभीररीत्या जखमी झाले. उपचारादरम्‍यान गुरुवारी मुंबईमध्‍ये त्‍यांचे निधन झाले.  
पुढे वाचा, महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रल्‍हाद कसा झाला होता लट्टू  

Loading...

Recommended


Loading...