Loading...

सुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड

सुनील तटकरे यांचे बंधू अनिल यांचा तो मुलगा आहे. संदीपच्या शिवसेना प्रवेशाने तटकरे कुटुंबातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

Divya Marathi Nov 06, 2016, 17:52 IST
रत्नागिरी- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तडकरे यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल यांचा तो मुलगा आहे. संदीपच्या शिवसेना प्रवेशाने तटकरे कुटुंबातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.   शिवसेना भवनात झालल्या छोटेखाली समारंभात संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आदेश बांदेकर, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘घडाळ्याचा काटा अडकला, भगवा झेंडा फडकला’ अशा घोषणा दिल्या. राष्ट्रवादीत सुनील तटकरे यांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे संदीप यांच्या शिवसेना प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.   संदीप तटकरे यांनी व्यक्त केली कौटुंबिक नाराजी
संदीप म्हणाले, की नगराध्यक्षपदासाठी मी राष्ट्रवादीकडे तिकीटाची मागणी केली होती. हे पद देण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांचा आहे. पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही. आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही. आता माझ्या राजकारणाला खरी सुरवात झाली आहे. आव्हानांवर मात करुन मला स्वतःला सिद्ध करायचे आहे. शिवसेना मला बळ देईल. मला माझ्या काकांना कोणताही संदेश द्यायचा नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे.   अनंत गिते यांनी केले सुचक वक्तव्य
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनंत गिते म्हणाले, की ये तो बस झांकी है, आगे बहोत कुछ बाकी है. शेकापचे काही नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत तेही सेनेत प्रवेश करतील. संदीप तटकरे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे.

Loading...

Recommended


Loading...