Loading...

बाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरेंकडूनच, राणेंचा शिवसेना नेतृत्वावर आरोप

‘बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यात सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो त्यांचा मुलगा उद्धव यांनीच,’ असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला.

Divya Marathi Jul 19, 2014, 08:06 IST
रत्नागिरी - ‘बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यात सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो त्यांचा मुलगा उद्धव यांनीच,’ असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. ‘शिवसेनेला आता नेतृत्वच उरले नसून लोकसभा निवडणुकीत त्यांचे जे 17 खासदार निवडून आले ती सर्व मोदींचीच कृपा होती,’ असे सांगतानाच ‘यापुढे माझ्यावर टीका केल्यास उद्धव यांचे पुरते वस्त्रहरण करीन,’ असा इशाराही राणेंनी दिला.   शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकरांशी बोलताना आपण पुढील भूमिका सोमवारीच स्पष्ट करू असे सांगत नवा पक्ष स्थापण्याची शक्यता फेटाळून लावली.

Loading...

Recommended


Loading...