Loading...

उरणच्या नागरिकांची दिवाळी अंधारात, ट्रान्सफार्मर जळून खाक

उरण तालुक्यात वीजपुरवठा करणार्‍या बोकडवीरा येथील महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही सबस्टेशनला आज (गुरुवारी) सकाळी भीषण आग लागली.

Divya Marathi Oct 23, 2014, 21:48 IST
रायगड- उरण तालुक्यात वीजपुरवठा करणार्‍या बोकडवीरा येथील महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही सबस्टेशनला आज (गुरुवारी) सकाळी भीषण आग लागली. आगीत ट्रान्सफार्मर पूर्णपणे  जळून खाक झाला आहे. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उरणसह तालुक्यातील गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अंधारात दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

मिळालेली माहिती अशी की, बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पला लागून असणार्‍या  महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही सबस्टेशनचा कोट्यवधी  रुपयांचा ट्रान्सफार्मर जळून खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्याच्या साह्याने आग विझवण्यात आली. उरण तालुक्यातील वीजपुरवठा किमान दोन दिवस तरी बंद राहील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
 

Loading...

Recommended


Loading...