Loading...

‘मैत्री अशी अाणि तशी’

‘मैत्री’ हा अायुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असताे, जाे अायुष्यातील चढ-उतारात अापली साेबत करताे, अाधार देताे, अापली उमेद टिकवून ठेवताे, पण जर या सुंदर नात्याची वीण उसवत गेली, तर माणसाचं अायुष्य वैराण हाेऊ शकतं, त्याचे दूरगामी परिणाम घडू शकतात.

Divya Marathi Apr 07, 2017, 03:05 IST
‘मैत्री’ हा अायुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असताे, जाे अायुष्यातील चढ-उतारात अापली साेबत करताे, अाधार देताे, अापली उमेद टिकवून ठेवताे, पण जर या सुंदर नात्याची वीण उसवत गेली, तर माणसाचं अायुष्य वैराण हाेऊ शकतं, त्याचे दूरगामी परिणाम घडू शकतात. वैयक्तिक अायुष्य, करिअर, इतर नातेसंबंध यावरही ठळक दुष्परिणाम घडू शकतात. अशा या मैत्रीच्या नात्याचं महत्त्व अाेळखून लेखिका जॅन येगर यांनी दीर्घ संशाेधनातून या विषयाची सविस्तर मांडणी केली अाहे. मैत्रीचं नातं जाेडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, त्यामुळे अायुष्य अधिक अानंदी व सुखकर बनण्यासाठी काय करता येईल, तसंच नकारात्मक मैत्री, मैत्रीत उद‌्भवणारे संघर्ष यावर कशी मात करता येईल अशा अनेक पैलूंना तपशीलवार स्पर्श करत हे पुस्तक ‘मैत्री’विषयक मार्गदर्शन करतानाच अात्मपरीक्षणास प्रवृत्त करते. जॅन येगर या नातेबंधांविषयी लेखन करणाऱ्या व व्याख्याता म्हणून अांतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध अाहेत. गेली २० वर्षे त्या नात्यांचा विस्तृत अभ्यास करत अाहेत. त्यात मैत्री हा त्यांचा विशेष संशाेधनाचा विषय अाहे. त्यांची काही पुस्तके जगभरातील भाषांत अनुवादित हाेत अाहेत. त्यांच्या मुलाखती मुद्रित व दृक‌श्राव्य माध्यमातून वरचेवर प्रसिद्ध हाेत असतात. १९८० पासून लेखिकेने मैत्री या विषयावर जे काही संशाेधन केले अाहे ते बऱ्याचअंशी या पुस्तकात उतरलेले अाहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत पुढे अालेल्या काही नवीन मुद्द्यांचा अभ्यासही यात अालेला अाहे. हा सगळा अभ्यास सुमारे १८० मैत्री सर्वेक्षणांच्या प्रतिसादकांवर अाधारित अाहे. यासाठी लेखिकेने एका वेबसाइटद्वारे पाेस्ट केलेल्या प्रश्नावलीला मिळालेल्या प्रतिसादाचा अाणि काही निवडक दूरध्वनीवरील सविस्तर संभाेरे व व्यक्तिश: मुलाखती यांचाही या अभ्यासात समावेश अाहे. यात ४१ पुरुष, १३९ स्त्रियांनी १८० प्रश्नावली भरून दिल्या अाहेत. हे सगळे १३ ते ७२ या वयाेगटातील हाेते. तुमची मैत्री अल्पकालीन असाे वा कायमची, ती अापल्या अायुष्यातील अनमाेल बंधच असते. विशेषत: ती सकारात्मक मैत्री असते, तेव्हा तर हा भावबंध अमूल्यच असताे. समजा एखादी मैत्री कायम राखता अाली नाही, तरी अापण या नात्यातून स्वत:बद्दल अाणि एकूण मैत्री या विषयाबद्दल बरंच जाणून घेऊ शकताे. अपयशी मैत्रीच्या नैराश्याशी कसा सामना करावा अाणि स्वत:ला व तुमच्या त्या मित्र-मैत्रिणीला माफ कसं करावं, हे तुम्हाला या पुस्तकातून करता येईल.   प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस लेखक : जॅन येगर, अनुवाद : सुप्रिया वकील, किंमत : २५० रुपये

Loading...

Recommended


Loading...