Loading...

योगा केल्याने शारीरिक-मानसिक व्याधी होतात दूर

अरविंद घोष यांनी योग म्हणजे पूर्णत्वाकडे प्रवास असे म्हटले आहे. पशूकडून मानवाकडे, मानवाकडून अतिमानवाकडे, अतिमानवाकडून देवत्वाकडे सतत प्रवास चालू असतो, अशाच काहीशा फरकाने जीवशास्त्रज्ञ डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यात उन्नत अवस्था होते यावर सर्वांचे एकमत आहे. शास्त्रानुसार ईश्वरप्राप्तीसाठी मुख्यत: जे चार मार्ग सांगितले आहे. त्या�

Divya Marathi Jul 20, 2015, 23:43 IST
योग आणि विज्ञान
हसण्यामुळे शरीरातील सर्व स्नायूंना व्यायाम होतो. प्रत्येक आजारपणात मनाचा वाटा हा असतोच विधायक मानसिक बैठक हा योगाचा पाया आहे.   अरविंद घोष यांनी योग म्हणजे पूर्णत्वाकडे प्रवास असे म्हटले आहे. पशूकडून मानवाकडे, मानवाकडून अतिमानवाकडे, अतिमानवाकडून देवत्वाकडे सतत प्रवास चालू असतो, अशाच काहीशा फरकाने जीवशास्त्रज्ञ डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यात उन्नत अवस्था होते यावर सर्वांचे एकमत आहे.
शास्त्रानुसार ईश्वरप्राप्तीसाठी मुख्यत: जे चार मार्ग सांगितले आहे. त्यामधील राजयोग हा एक मार्ग. या राजयोगाच्या मार्गाने जाण्यासाठी आसने व प्राणायाम ही साधने होत. योग हा स्वानुभावावर आधारीत आहे तर विज्ञानात नियम सिद्ध करण्यासाठी पुरावाच लागतो. योग ही विशेष प्रकारची जीवनपद्धती असून अंतिम ध्येय सत्यप्राप्ती असते, यामधून योग मार्ग हा स्थूलातून सूक्ष्माकडे विज्ञानाप्रमाणेच जात असतो. आजच्या शास्त्रज्ञांनी विज्ञानातील अतिसूक्ष्म कण (गॉड पार्टिकल) ही अंतिम अवस्था मानली आहे.   पुढील स्लाइड्सवर क्लीक करा आणि पाहा याेगासणाचे फायदे...  

Loading...

Recommended


Loading...