Loading...

देशातील सर्वात मोठा रेल्वेचा बोगदा

रेल्वेच्या बोगद्याची लांबी कोणत्याही इतर बोगद्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. हा बोगदा 11 कि.मी.चा आहे. हा बोगदा तयार झाल्याने आता थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे सहज पोहोचू शकणार आहे.

Divya Marathi Nov 05, 2011, 15:54 IST

रेल्वेच्या बोगद्याची लांबी कोणत्याही इतर बोगद्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. हा बोगदा 11 कि.मी.चा आहे. हा बोगदा तयार झाल्याने आता थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे सहज पोहोचू शकणार आहे. पीरपंजाल पर्वताच्या रांगेत याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी या बोगद्याचे खोदकाम करून शेवटचा अडथळा दूर करण्यात आला आहे. हा बोगदा तयार करण्यास सात वर्षे लागली. भारतातील हा पहिला, तर आशियातील सर्वात जास्त लांबीचा रेल्वेचा बोगदा आहे. हा बोगदा उधमपूर आणि बारमुल्ला रेल्वे प्रोजेक्टचा हिस्सा आहे. याला तयार करण्यासाठी 391 कोटी रुपये खर्च आला आहे. याचा भाग तयार झाल्यानंतर इथली घाटी संपूर्ण देशाशी जोडली जाणार आहे. ही रेल्वे लाइन डिसेंबर 2012 मध्ये चालू केली जाणार आहे. हा बोगदा पूर्णपणे फायर आणि वॉटरप्रूफ आहे.


Loading...

Recommended


Loading...