Loading...

आता बोला इंटरनेटवरून, तेही प्रतिमिनिट केवळ १०-१५ पैशांत

होय, इंटरनेटद्वारे तुम्ही देशातील कानाकोपर्‍यात असलेल्या नातेवाईक किंवा मित्राला बोलू शकाल, तेही अत्यंत कमी दरात!

Divya Marathi Nov 04, 2011, 16:38 IST

होय, इंटरनेटद्वारे तुम्ही देशातील कानाकोपर्‍यात असलेल्या नातेवाईक किंवा मित्राला बोलू शकाल, तेही अत्यंत कमी दरात! केंद्र शासन या दिशेने पाऊल उचलण्यासाठी विचार करत आहे. लवकरच इंटरनेट टेलिफोनची सुविधा देण्यास हिरवा झेंडा दाखवणार आहे.
यानंतर कोणतीही व्यक्ती मोबाइल किंवा लँडलाइनवरून इंटरनेटच्या माध्यमाने बोलू शकणार आहे. शासनाने यापूर्वीच अवघ्या 1500 रुपयांत आकाश टॅबलेट कॉम्प्युटर सुरू करून तहलकाच माजवला आहे. आता इंटरनेटद्वारे कॉल करण्याची सुविधा दिल्यास टेलिकॉम विश्वात क्रांतिकारक बदल घडू शकतील. सध्या भारतात इंटरनेटवरून कॉल करण्याची सुविधा उपलब्ध नाही. शासन नवीन दूरसंचार नीती आणण्यावर भर देत आहे. इंटरनेटद्वारे मोबाइल किंवा टेलिफोनवर संभाषण केल्यास कॉलचा दर 10 ते 15 पैसे प्रतिमिनिट असू शकतो. सध्यातरी देशात अनेक टेलिफोन कंपन्या ग्राहकांना इंटरनेट सुविधा किंवा चॅटिंग करण्याची परवानगी देत आहेत. यास व्हिओआयपी असे म्हटले जाते. यात प्रतिकॉल 10 पैसे प्रतिमिनिट दर लागतात. यात संभाषण करताना त्या व्यक्तीचे चित्रही पाहता येणार आहे.
Loading...

Recommended


Loading...