Loading...

पाक परराष्ट्रमंत्री म्हणाले, कुलभूषण जाधव प्रकरणात ‘कठोर निर्णय’ घेणार, फाशीच्या शिक्षेचे संकेत

जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पाकिस्तानच्या बाजूने निर्णय होईल, अशी अपेक्षा कुरेशी यांनी व्यक्त केली.

Divya Marathi Aug 23, 2018, 21:29 IST

इस्लामाबाद- पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान सरकारमधील परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीचेही संकेत त्यांनी दिले.

 

गृहनगर मुल्तानमध्ये गुरूवारी प्रसार माध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी हे संकेत दिले. ते म्हणाले, आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत आहोत. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. देशाने तयार व्हायला हवे. जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पाकिस्तानच्या बाजूने निर्णय होईल, अशी अपेक्षा कुरेशी यांनी व्यक्त केली. आमच्याकडे जाधव यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत.


Loading...

Recommended


Loading...