न्यूयॉर्क - अमेरिकेत शंभर वर्षे जुन्या बंगल्याची अवघ्या 10 डॉलरमध्ये विक्री केली जात असल्याचे वृत्त व्हायरल झाले. परंतु, इतकी कमी किंमत असतानाही तो खरेदी करण्यासाठी कुणीच आलेला नाही. कारण, त्यात एक ट्विस्ट आहे. 6 बेडरुमचा हा बंगला खरेदी करणाऱ्याला तो विकत घेऊन दुसरीकडे शिफ्ट करावा लागणार आहे. प्रॉपर्टीची ओनर कंपनी या ठिकाणी वेग-वेगळी घरे बनवू इच्छित आहे. परंतु, बंगला शंभर वर्षे जुना असल्याने तो सुरक्षित आहे. कंपनीने तो खरेदी करताना एक करार केला होता, की बंगल्याचे बांधकाम पाडणार नाही. त्यामुळेच, कंपनी तो विकण्यासाठी विवश आहे.
सर्वात महागड्या बंगल्यांपैकी एक...
'प्लीझंट अॅव्हेन्यू' असे या बंगल्याचे नाव असून न्यूजर्सी येथील मॉन्टक्लेयर या ठिकाणी ते आहे. 3900 स्क्वेयर फुटमध्ये असलेल्या या बंगल्यात 6 बेडरूम, तीन बाथरूम, टेनिस कोर्ट आणि कॅरेज हाउससह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बंगल्याच्या जवळपास अडीच एकर जमीन आहे. या व्यतिरिक्त बंगल्याचे बांधकाम अतिशय सुंदररित्या करण्यात आले आहे. मार्केटमध्ये या बंगल्याची किंमत 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. प्लीझंट अॅव्हेन्यूला ऐतिहासिक महत्व देखील आहे. यापूर्वी हा बंगला आफ्रिकन अमेरिकन अॅथलीट आणि फुटबॉल टीमचे कॅप्टन ऑब्रे लेव्हिस यांच्या मालकीचा होता. लेव्हिस एफबीआयचे पहिले ब्लॅक सदस्य होते. 2001 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर बीएनई रिअल एस्टेट कंपनीने ते विकत घेतले होते.
शिफ्टिंगमध्ये येणार मोठा खर्च
रिअल एस्टेट एजंट लॉरेन व्हाइट यांच्या मते, हा बंगला दुसरीकडे हलवण्यासाठी हजारो डॉलर खर्च येणार आहे. खर्च केवळ शिफ्टिंगचाच नव्हे, तर शिफ्टिंग करताना होणाऱ्या नुकसानीची डागडुजी करण्यातही लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, ती डागडुजी सुद्धा हिस्टॉरिक गाइडलाइंसनुसार, तज्ञांकडूनच करावी लागेल. शिफ्टिंग करताना बंगल्याच्या जुन्या मालकाला सुद्धा अतिरिक्त 10 हजार डॉलर खर्च करावा लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...